Sangvi : सांगवी पोस्ट ऑफिसमध्ये घाणीचे साम्राज्य!; ऑफिस स्थलांतरीत करण्याची महिलांची मागणी

एमपीसी न्यूज – सांगवी पोस्ट ऑफिसमध्ये गेले तर माणूस तिथल्या वातावरणाने गुदमरून जाईल, अशी स्थिती झाली आहे. इथे नियमित (पैसे) भरणा करणाऱ्या महिला एजंट जयश्री गुमास्ते, आश्विनी खळदकर, नीलिमा पाटील, सुषमा चौधरी, मीना बोरूले, कल्पना वाघमळे यांनी वस्तूथितीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. या भागातील स्थानिक नगरसेवकांनी या समस्येकडे लक्ष घालून पोस्ट ऑफिस परिसर दुर्गंधीमुक्त करावा, अन् पोस्ट ऑफिसला एक वेगळी जागा द्यावी, अशी मागणी या सर्व महिलांनी केली आहे.

सांगवी पोस्ट ऑफिसला नवी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच इथल्या पोस्ट ऑफिसचे स्थलांतर झाले नाही. भरणा करण्यासाठी आलेल्या महिला एजंटला आणि जेष्ठ नागरिकांना तठस्थ उभे राहावे लागते. स्वछतागृहाचा अभाव, बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अन् चार तास महिला एजंटला पैसे भरण्यासाठी तेथेच थांबावे लागते. पोस्टातील कामगार कमी आहेत. त्यात इंटरनेट व्यवस्था कोलमडल्यामुळे कामात उशीर होतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे दिवसा डास, चिलटे याचा त्रास सहन करावा लागतो, अशी खंत महिला पोस्टल एजंन्ट यांनी व्यक्त केली आहे.

  • पोस्टाचे अधिकारी आपल्या कामाची व्याप्ती वाढवा, इतकेच सांगण्यासाठी येतात. पण, वारंवार तक्रार करून सोयीसुविधा करीत नाहीत .यासाठी कायम स्वरूपी नियोजन व्हावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.