Sangvi : नवी सांगवीत बुधवारपासून ज्ञानगंगा व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – नवी सांगवी येथील कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानगंगा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 23 ते शुक्रवार 25 जानेवारी या कालावधीत ही व्याख्यानमाला होणार आहे. अशी माहिती संयोजक श्रीकांत चौगुले, सूर्यकांत गोफणे, अॅड. शंकर थिटे यांनी दिली.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृह येथे ही तीन दिवसीय व्याख्यानमाला होणार आहे. या व्याख्यानमालेचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुधवार दि. 23 जानेवारीला प्रसिध्द साहित्यिक व कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांचे कथाकथन, गुरुवार दि. 24 जानेवारीला बंडा जोशी व अनिल दिक्षित यांची हास्यमैफल, शुक्रवार (दि. 25) जानेवारीला संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे महाराष्ट्र परंपरा आणि प्रबोधन याविषयावर बोलणार आहे.

या व्याख्यानमालेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.