Sangvi : पत्नीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घालून पाडून बोलून तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पती, नणंद सोनाली बेदरकर, सुनील बेदरकर, उज्वला विनायक निघोजकर (रा. रांजणगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सचिन याचे फिर्यादी महिलेशी 2010 साली लग्न झाले. त्यानंतर त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास दिला. वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच पत्नीला खालच्या जातीची असल्याचे सतत बोलून तिला जातीवाचक शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.