Sangvi : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2019 ते 6 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय पतीसह सासरे आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांचा जून 2019 मध्ये विवाह झाला. विवाहाच्या दोन दिवसानंतर आरोपींनी विवाहितेकडे दोन लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली. त्यावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विवाहितेला जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.