Sangvi: फोटो स्टुडिओसाठी कर्ज काढावे म्हणून विवाहितेचा छळ; पती, सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज – फोटो स्टुडिओ सुरु करण्यासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज काढून देण्याची मागणी करत तसेच घरगुती कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. अशी फिर्याद सांगवी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

 

याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती रितेश हरिश्चंद्र सालियान, सासू कमल हरिश्चंद्र सालियान (दोघे रा. पिंपळे निलख, विशालनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एक एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना लॉकरमध्ये दागिने ठेवण्यावरून तसेच जेवण बनविता येत नसल्यावरून टोमणे मारून छळ केला. तसेच बुलेट दुचाकी घेऊन तिचे हप्ते भरण्यासाठी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. फिर्यादी यांना धमकी देऊन फोटो स्टुडिओ सुरु करण्यासाठी दहा लाख रुपयांचे कर्ज काढून देण्यासाठी वाद घालून शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.