Sangvi : पिंपळे सौदागर येथे दुचाकी घसरल्याने डॉक्टर महिलेचा अपघात

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे महिला डॉक्टरची मोपेड दुचाकी गतिरोधकावरून घसरली. यामध्ये डॉक्टर महिला रस्त्यावर पडल्या. त्यावेळी रस्त्याने जाणा-या एका टँकरचे चाक त्यांच्या पायावरून गेले. यामध्ये महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज (रविवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

डॉ. सोनाल नानाराव नागोरे (वय 26, रा. बालेवाडी) असे जखमी झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सोनाली आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथून मोपेड दुचाकीवरून (एमएच 12 / एमएक्स 9235) जात होत्या. मारुती शोरूम समोरील बीआरटी रोडवरून जात असताना एका गतिरोधकावरून त्यांची दुचाकी घसरली. यात त्या रस्त्यावर पडल्या. त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या टँकरचे चाक त्यांच्या दोन्ही पायावरून गेले.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत रुग्णवाहिकेतून त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगवी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.