Sangvi : पावणेआठ लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – गुंतवणुकीच्या नावाखाली सात लाख 85 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिरुद्ध आनंदकुमार होसिंग (वय 27, रा. ब्रम्हगाठ विश्वेश्वरगंज, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज शशिकांत नायडू (वय 38, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2018 ते 28 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपी अनिरुद्ध याने फिर्यादी मनोज यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाखाली पुणे विमानतळ येथे सात लाख 85 हजार रुपये घेतले. घेतलेल्या पैशांचा मोबदला न देता अनिरुद्ध याने मनोज यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.