Sangvi : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे घडली.

विजय निर्मल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 ते 1 डिसेंबर 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. ऑक्टोबर महिन्यात पीडित तरुणी गणपती पाहण्यासाठी बाहेर गेली. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घेतली.

तसेच लग्नाला नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर रविवारी (दि. 1) तरुणी भाजी मंडई येथे गेली असता आरोपीने तिचा विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.