Pimple Saudagar : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन हॉटेल जळून खाक

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन हॉटेल जळून खाक झाली. ही घटना आज (गुरुवारी) चारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रोडवर घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र तीन हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रोडवर वैष्णवी हॉटेल, हॉटेल एमएच 27 आणि जस्ट ग्रील हॉटेल या तीन हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीचा भडका उडाल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. दुपारी चारच्या सुमारास अग्निशमन विभागाला स्थानिक नागरिकांनी माहिती दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन विभाग आणि रहाटणी अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. काही वेळच्या परिश्रमानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले.

या आगीत तीनही हॉटेलचे मिळून सुमारे 7 लाख 70 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची सुरुवात कोणत्या हॉटेल पासून झाली, याबाबत पोलीस तपास करीत असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही कामगिरी अग्निशमन विभागाचे अधिकारी संतोष सरोटे, विजय घुगे, भूषण येवले, ओंकार फरांदे, राजाभाऊ लांडगे, भाईदास बाटुंगे यांच्या पथकाने केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.