Sangvi : खोल चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला अग्निशमन दलाकडून जीवनदान

एमपीसी न्यूज – खोल चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवनदान दिले. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.

फायरमन भूषण येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता नवी सांगवी येथील स्थानिक नागरिक विनायक बडदे यांनी अग्निशमन दलाला फोनवरून माहिती दिली की, नवी सांगवी येथील पाण्याच्या टाकीजवळ सुमारे 10 फूट खोल चेंबरमध्ये एक बैल पडला आहे. चेंबरचा आकार अतिशय कमी असल्याने त्यात तो बैल अडकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रहाटणी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. चेंबरयामध्ये अडकलेल्या बैलाचे वजन सुमारे दोन टन एवढे होते. चेंबरचा आकार कमी आणि बैलाचे वजन जास्त असल्यामुळे त्याला वर काढण्यात अडचण येत होती. त्यानंतर मोठा रोप आणि जेसीबीच्या साहाय्याने बैलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नातून बैलाची चेंबरमधून सुटका करण्यात आली.

ही कामगिरी फायरमन संतोष सरोटे, विजय घुगे, मिलिंद पाटील, भूषण येवले, ओमकार फरांदे, वाहन चालक राजाराम लांडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.