_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Sangvi Fire News : एमएनजीएल पाईपलाईनमधून गॅस लिकेज झाल्याने आग

एमपीसी न्यूज – एमएनजीएल पाईपलाईनमधून गॅस लिकेज झाल्याने आग लागली. ही घटना मयूर नगरी- सांगवी येथे मंगळवारी (दि. 11) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पाईपलाईनच्या बाजूला असलेल्या चार कार जळालया आहेत. यामध्ये चारही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील मयूर नगरी येथे एमएनजीएल कंपनीचे काही कर्मचारी गॅस पाईपलाईनवर काम करत होते. पाईपलाईन गेलेल्या मार्गावर ब्रेकरने खोदत असताना गॅस पाईपलाईन फुटली आणि त्यातून गॅस बाहेर पडला. दरम्यान या गॅसने पेट घेतला.

_MPC_DIR_MPU_II

गॅसने अचानक पेट घेतल्याने आगीच्या ज्वाला हवेत उंचीपर्यंत जात होत्या. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन मुख्य विभागाचे दोन आणि रहाटणी उपविभागाचा एक असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.

काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला आहे. आग लागलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेत पाईपलाईनच्या बाजूला असलेल्या चार कार जळालया आहेत. यामध्ये चारही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.