Sangvi : गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे अंतर्गत वादातून टोळक्‍याने पाच ते सहा गाड्या फोडल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास साठ फुटी रोड येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

विशाल उर्फ पप्पु काशीद , विजय राजू काळे, आण्णा उर्फ युवराज कुमार स्वामी, रॉबर्ट उर्फ वैभव संजय गायगुले, प्रशांत राजु कदम (सर्व राहणार पिंपळे गुरव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शेखर चांदणे (वय 45, रा. ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांदणे यांच्याशी असणाऱ्या अतंर्गत वादातून विशाल व त्याच्या साथीदारांनी मंगळवारी (दि. 25) पहाटे कोयत्याच्या सहाय्याने परिसरात दहशत पसरवत ओंकार कॉलनी मधील रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षा, टेम्पो अशा पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चांदणे यांच्या तीन गाड्या होत्या. सांगवी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.