BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : फ्लॅटच्या वादातून चौघांची महिलेस मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – फ्लॅटच्या वादातून चौघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना विनायकनगर, नवी सांगवी येथे रविवारी (दि. 6) घडली.

सोनाली सुहास बनसोडे (वय 40, रा. रवीकिरण अपार्टमेंट, विनायकनगर, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार राजेंद्र काशिनाथ कांबळे, सुरेखा राजेंद्र कांबळे (दोघेही रा. विश्रांतवाडी, पुणे), मेघा कांबळे, बाळी कांबळे (दोघेही रा. मु. पो. वाहगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनाली आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये सोनाली या राहत असलेल्या फ्लॅटवरून वाद आहे. रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी सोनाली यांच्या घरी आले. त्यावेळी सोनाली यांनी दरवाजा उघडला नाही. यामुळे आरोपींनी ड्रील मशिनच्या सहाय्याने दरवाजा उघडला.

त्यानंतर सोनाली यांच्या अंगावर रॉकेल टाकले. तसेच भिंतीवर डोके आपटून “तू या घरात कशी राहते तेच बघतो, तुला मारून टाकतो, अशी धमकी दिली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Advertisement