Sangvi : कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांचा हजेरी अभिलेख तयार करून कंपनीची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीत कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांचा (Sangvi) हजेरी अभिलेख बनावटपणे तयार करून त्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी स्वतःचा खाते क्रमांक देऊन एच आर मॅनेजरने कंपनीची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला.

अनिकेत साहेबराव राक्षे (वय 32, रा. साळूम्बरे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एच मॅनेजर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला यशदा डेव्हलपर्स या फर्ममध्ये जानेवारी ते डिसेंबर 2021 या कालावधीत एच आर मॅनेजर म्हणून कामास होती. तिने श्रीकांत जाधव हा फर्ममध्ये कामाला असल्याबाबत बायोमेट्रिक हजेरीमध्ये नाव नोंद केली. त्याचा खोटा व बनावट इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला.

Pimple Saudagar : पिंपळेसौदागर, रहाटणीतील पाणी समस्या लवकरच सुटणार – नाना काटे

कर्मचाऱ्यांचे खोटे हजेरीपत्रक तयार केले. त्यात श्रीकांत जाधव याच्या बँक खात्याच्या माहितीमध्ये आरोपीने स्वतःचा बँक खाते क्रमांक दिला. त्याद्वारे पगार आणि बोनस असे दोन लाख 37 हजार 526 रुपये स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यानंतर फर्ममधून तीन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची एक महिन्याची हजेरी लावून त्यांचे पगार देखील आरोपीने तिच्या बँक खात्यावर घेतले. यामध्ये एकूण तीन लाख दोन हजार 225 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस (Sangvi) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.