Sangvi : जुनी सांगवी परिसरातील गॅस शवदाहिनी चार दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील जुनी सांगवी येथे वसंतदादा पुतळा, बसस्टॅन्ड समोर उभारण्यात आलेल्या पालिकेच्या सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाल्याने ­­­­शवदाहिनी चार दिवस बंद ठेवण्यात(Sangvi) येणार आहे. अशी माहिती ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ यांनी दिली.

जुनी सांगवी येथील सीएनजी गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कारासाठी पिंपरी मनपा क्षेत्रातील विविध ठिकाणाहून नागरिक येतात. सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनेलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी मे.एन.वाय.सी. एंटरप्रायजेस यांना देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले असून हे काम पूर्ण होण्यास चार दिवस लागणार असल्याचे  ‘ह’ प्रभागातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ यांनी सांगितले.

Chinchwad : होर्डिंगचे  स्ट्रक्चरल ऑडीट करा, आमदार जगताप, माजी विरोधी पक्षनेते काटे यांची मागणी

यामुळे जुनी सांगवी परिसरातील सीएनजी गॅस शवदाहिनी चार दिवस बंद(Sangvi) राहील,याची महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.