Sangvi: पिंपळे सौदागर येथील पीडित कुटुंबाच्या पाठीशी सरकार, अजित पवारांकडून सांत्वन

Sangvi: Government with the support of the victim's family at Pimple Saudagar, consolation from dcm Ajit Pawar सांगवी मधील पिंपळे सौदागर परिसरात 7 जून रोजी रात्री एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथे 7 जून रोजी झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेतली. तसेच कुटुंबीयांचे सांत्वन करत सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

सांगवी मधील पिंपळे सौदागर परिसरात 7 जून रोजी रात्री एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अधिनियम आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. या प्रकरणाचा तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव करीत आहेत.

या प्रकरणातील पीडित कुटुंबाची आज (रविवारी, दि. 14) उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. काही विघ्नसंतोषी लोक या प्रकरणाला जातीय रंग देऊन सामाजिक सलोखा बिघडवत आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होईल असे कोणीही वागू नये, असे आवाहन पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

पीडित कुटुंबीयांनी पवार यांच्याकडे दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

त्यावर सरकार पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आहे. दोषींवर कठोर शासन होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री पवार यांनी आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.