Sangvi : जेवण, दारु लवकर न दिल्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवण व दारु लवकर न दिल्याच्या कारणावरून वाद घालून हॉटेल मॅनेजरला मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोघांनाही जखमी केले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री पिंपळे गुरव येथे घडली.

राजू कालाचंद बॉस (वय 22, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, इम्रान शफियोद्दीन जुनेदी (वय 29, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी), म्हस्के (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) मानसिंग आदियाल (रा. पिंपळे गुरव) तसेच अन्य दोन अनोाळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी जुनेदी याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी रात्री पिंपळे सौदागर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. हॉटेलमधील कर्मचा-यांनी जेवण व दारू लवकर न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी हॉटेलमध्ये वाद घातला. यात हॉटेल व्यवस्थापक सुधाकर शेट्टी यांना दगड मारून जखमी केले.

फिर्यादी व त्यांचा मित्र पंकज रॉय भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी यांनी दगड फेकले. यात दगड लागून फिर्यादी यांच्या डोक्याला जखम झाली. इतरांनी राजू सरकार यांना काठीने मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी आरोपी इम्रान याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.