BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीवर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून पत्नीने दिलेल्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भालेकरनगर पिंपळे गुरव येथे घडली.

शुभांगी संदीप कापसे (वय 30, रा. सावली निवास, भालेकर नगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी 64 वर्षीय सासूने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप कापसे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 ते 27 जून 2019 या कालावधीत हा प्रकार सावली निवास, भालेकर नगर पिंपळे गुरव येथे घडली. आरोपी महिलेने त्यांचे मयत पती यांच्याशी राहत्या घराच्या वाटणीवरून वारंवार वाद घातले. शिवीगाळ करून घटस्फोट घेण्याची धमकी दिली.

तसेच मानसिक त्रास देऊन सनदी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असे संदीप यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3