Sangvi crime News: ‘मला फोन केला नाही तर कुटुंबासह मी आत्महत्या करीन’; विवाहितेला धमकावणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – ‘मला फोन केला नाही तर मी माझ्या पूर्ण कुटुंबासह आत्महत्या करीन. तू तुझ्या नव-याला सोडून ये’ अशी विवाहित महिलेलाधमकी देणा-यास पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते 27 सप्टेंबर 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला आहे.

मोहन मुरलीधर मुळे (वय 49, रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळे हा फिर्यादी महिलेवर एकतर्फी प्रेम करत आहे. त्यातून त्याने फिर्यादी महिलेला वारंवार फोन केला.

फोनवरून ‘तू मला रोज फोन केला पाहिजे. तू जर मला फोन केला नाही तर मी माझ्या पूर्ण कुटुंबासह आत्महत्या करीन. नाहीतर तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन. माझ्यासोबत पळून चल. तू माझ्यासोबत पळून आली नाहीस तर तुझी बदनामी करीन. तुझ्या नव-याला सोडून ये, आपण लग्न करू’, अशी आरोपीने धमकी दिली.

आरोपीने पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. त्यावरून आरोपीने ‘तू मला बाहेर रस्त्यावर दिसली तर तुला मारून टाकीन’, अशी धमकी देत शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.