Sangvi : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

आश्विन आनंदराव चव्हाण (वय 19, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक नितीन दांडगे याना माहिती मिळाली की, पिंपळे गुरव येथील मिलिटरी ग्राउंडजवळील रोडवर एक तरुण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार सांगवी पोलिसांनी परिसरात सापळा रचून आश्विन याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी नितीन दांडगे, कैलास केंगले,चंद्रकांत भिसे, दीपक पिसे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, अनिल देवकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.