Sangvi : लग्नाच्या आमिषाने व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मिडीयावर ओळख झालेल्या महिलेने लग्नाचे ( Sangvi ) आमिष दाखवले. त्यानंतर आईचे आजारपण, भाऊ बहिणीचे शिक्षण आणि कर्जाचे कारण सांगून व्यक्तीकडून दीड लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर संपर्क बंद करून फसवणूक केली. हा अप्रकार जानेवारी ते 14 एप्रिल या कालावधीत सांगवी परिसरात घडली.
सुब्रमण्यम पद्मनाभन अय्यर (वय 43, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PCMC : विशाखा समिती अध्यक्षाविनाच…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी महिलेसोबत सोशल मिडियावरून ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झाले. आरोपीने फिर्यादी सोबत लग्न करण्याचे कबूल केले. त्यानंतर आईचे आजारपण, भाऊ बहिणीचे शिक्षण आणि मालकाकडून घेतलेल्या कर्जाचे कारण सांगून पैशांची गरज असल्याचे फिर्यादीस भासवले. फिर्यादीकडून एक लाख 47 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत ( Sangvi ) आहेत.