BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : आयटी अभियंत्याने गोळी झाडून केली आत्महत्या

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

शिवाजी वाडेकर (वय 28, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. आष्टी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विमाननगर येथील एक आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याने काम सोडले होते. शिवाजी त्याचा लहान भाऊ दीपक आणि मित्र विशाल लहाने यांच्यासोबत पिंपळे गुरव येथे राहत होता. रविवारी सायंकाळी शिवाजी याने पिस्तूलातून गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून लहान भाऊ आणि मित्र त्याच्याजवळ आले असता शिवाजी गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आले. त्यांनी अन्य एका मित्राच्या मदतीने शिवाजीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाकडे पिस्तुल कुठून आले, याबाबत सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.