Sangvi : बायकोवरील चारित्र्याच्या संशयावरून एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज –  बायकोशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या (Sangvi) संशयावरून पतीने एकावर चाकूने वार करत जखमी केले. हि घटना जुनी सांगवी येथील मुळानगर झोपडपट्टीत शुक्रवारी (दि.4) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

अमित निलाप्पा चलवादी (वय 26, रा.जुनी सांगवी) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सांगवी पोलिसांनी आरोपी रमेश महादेव देवकेरी (वय 25, रा.जुनी सांगवी) याला अटक केली आहे. यात मल्लेश चलवादी हा जखमी झाला आहे.

Bhosri : अभियंत्याकडे खंडणी मागणाऱ्याला अखेर अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश याला अमीत याचा भाऊ मल्लेशवर संशय होता, की त्याचे व रमेशच्या पत्नीचे प्रेमसंबंध आहेत. याच रागातून रमेश याने मल्लेशसोबत भांडण करत त्याच्या पोटावर डाव्या बाजूला वार करत गंभीर जखमी केले. यावरून सांगवी (Sangvi)पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.