Laptop theft : सांगवी येथे घरातून तीन लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज :  सांगवी येथे उघड्या दरवाजावाटे घरातून दीड लाख रुपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले.(Laptop theft)ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी ढोरे पाटील फार्मनवी सांगवी येथे उघडकीस आली.

गौरव रामचंद्र जाधव (वय 25,र आ. ढोरे पाटील फार्म, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Domestic violence : घरगुती कारणावरून विवाहितेचा क्रुर छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा सोमवारी (दि. 26) रात्री साडेदहा ते मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत उघडा होता.(Laptop theft) त्यावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातून दीड लाख रुपये किमतीचे तीन लॅपटॉप आणि लॅपटॉप चार्जर चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.