Sangvi : एक लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा 15 हजार परताव्याचे आमिष ;गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक

एमपीसी न्यूज – एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यावर (Sangvi)प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये परतावा मिळेल, अशी स्कीम सांगून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या अमिषाला बळी पडत काही जणांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली.

 

मात्र त्यात कोणताही मोबदला न मिळाल्याने गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. हा प्रकार एप्रिल 2021 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत पिंपळे सौदागर येथील आर बी कॅपिटल येथे घडला.

विकास रामराव मिरटकर (वय 33, रा. मोशी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश आप्पा भोसले (रा. नऱ्हे, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Sangvi)आर बी कॅपिटल या वित्तीय संस्थेत एक लाख रुपये गुंतवणूक केल्यास महिन्याला 15 हजार रुपये जास्तीचा परतावा मिळेल. 12 महिन्यानंतर गुंतवणूकदाराला दोन लाख 80 हजार रुपये मिळतील, या आकर्षक स्कीमचे आमिष दाखवण्यात आले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना यामध्ये 35 लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

Pune : विचारांच्या तलवारीला धारदार करणे गरजेचे : तुषार गांधी

त्यानंतर त्यांना आजवर 35 लाखातील 13 लाख 70 हजार रुपये देण्यात आले. उर्वरित 21 लाख 30 हजार रुपये त्यांना मिळाले नाहीत. तसेच सुरेश गुरुनाथ जीगलूर (रा. हुबळी, कर्नाटक) यांनी देखील या स्कीममध्ये दोन कोटी 85 लाख रुपये गुंतवणूक केली. त्यांनाही कोणताही परतावा मिळाला नाही.

गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादी आणि जीगलूर यांची तीन कोटी सहा लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

तीन कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्यास त्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातो. फिर्यादी विकास मिरटकर यांनी दाखल केलेल्या प्रकरणात फसवणुकीची रक्कम तीन कोटींहून अधिक असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.