Sangvi : दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक; दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सांगवी आणि चतुशृंगी पोलीस ठाण्यातील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ज्योतीराम पन्नालाल चखाले (वय 19, रा. नवी सांगवी) असे दुचाकी चोराचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुंडा स्काॅडची कारवाई करीत असताना नवी सांगवी मधील फेमस चौकातून एक तरुण संशयितरीत्या मोटर सायकल वरून जाताना दिसला. यामुळे पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला.

पोलिसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोपेड दुचाकी बाबत विचारपूस केली असता त्याने ती दुचाकी चोरल्याचे सांगितले. तसेच त्याने चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरल्याचेही सांगितले. दुचाकी चोराकडून 35 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.