Sangvi: अन् होळीच्या सणाला अनाथ, दिव्यांग मुलांना मिळाले पुराणपोळीचे भोजन!

एमपीसी न्यूज – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पुरणपोळी दान उपक्रमात तब्बल 1,200 पुरणपोळ्या जमा झाल्या. त्यामुळे  ममता अंध कल्याण केंद्र व आधार अंध अपंग आनाथाश्रमातील दिव्यांग व अनाथ मुलांना होळीच्या सणानिमित्त पुरणपोळीच्या भोजनाचा आस्वाद घेता आला.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने होळीच्या सणाच्या निमित्ताने शहरातील सोसायटी, मंडळे व नागरिकांना होळीच्या दिवशी पुरणपोळी दान करण्याचे आव्हान करण्यात आले होते. होळी सणाला पुरणपोळीचा नैवेद्य व नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नैवेद्य होळीला अर्पण न करता आम्हाला द्या व त्याचबरोबर एकापेक्षा आधिक कितीही पुरणपोळी दान दिल्यास दिव्यांग, गरीब, अनाथांची होळी आनंदमय व गोड होईल या उदात्त भावनेतून उपक्रम राबविण्यात आल्याचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.

सार्वजनिक मंडळांच्या व सोसायटीच्या होळीच्या ठिकाणी जाऊन 1200 पोळ्या व नैवेद्य गोळा केले मिळालेल्या पोळ्या ममता अंधः कल्याण केंद्र व आधार अंःध अपंग आनाथश्रमात  येथे जाऊन त्यांना पुरणपोळीचे जेवण दिले. त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जेवण केले. आळंदी येथील ज्ञानेशा व विकास रेसिडेन्सी  या सोसायटीच्या सभासदांनी तसेच दशरथ कांबळे, धिरज अंबवणे, गोविंद सोनी आदींनी या उपक्रमासाठी भरपूर प्रमाणात पोळ्या संकलित करून दिल्या.

_MPC_DIR_MPU_II

अनाथ, गरीब व दिव्यांग मुलांना समाजाकडून सर्व प्रकारची मदत मिळते, पण पुरणपोळी मिळत नाही. पुरणपोळी बनविणे वेळखाऊ काम असल्याने नागरिक देत नाहीत. पुरणपोळी मिळाल्याने या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही सर्वजण भावनिक झाल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो की वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यासाठी होळी पेटवली जाते असे करतांना नाहक वृक्षतोड केली जाते. ‘एकीकडे आपण झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देतो. तर दुसरीकडे आपणच वृक्षतोड  करतो. जागोजागी होळी न करता एकाच ठिकाणी होळी करुन निरुपयोगी लाकडे, पालापाचोळा व  प्रतिकात्मक पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन संस्थेने केले होते.

यावेळी अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, सुर्वणयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक शहाणे, उपाध्यक्ष संदीप दरेकर, युवक उपाध्यक्ष अक्षय जगदाळे , महिला उपाध्यक्षा नूतन शेळके, दशरथ कांबळे, गजानन धाराशिवकर, काळुराम लांडगे, प्रदीप गायकवाड, रोहित शेळके, पंडीत वनसकर, सतीश इथापे, संतोष जाधव, संग्राम तळेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.