Sangvi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या पाच जणांवर गुन्हा

पैशासाठी विवाहितेच्या छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.Married woman commits suicide due to in-laws' harassment; Crime against five of the father-in-law

एमपीसी न्यूज – पैशासाठी विवाहितेच्या छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुजाता ऊर्फ आरोही अभिजित गायकवाड (वय 23, रा. काशिदनगर, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

अभिजित गुंडू गायकवाड, गुंडू शंकर गायकवाड, शारदा गुंडू गायकवाड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दीपा आणि मेघा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक निवृत्ती कांबळे (वय 52, रा. देगाव रोड, सोलापूर) यांनी मंगळवारी (दि. 11) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तुझ्या लग्नात घरच्यांनी काही दिले नाही. तुझ्या माहेरकडील लोक भिकारी आहेत. त्यांची लायकी नाही’, असे म्हणून आरोपींनी विवाहितेचा वारंवार छळ केला.

तसेच आरोपींना हडपसर येथील प्लॉटवर घर बांधायचे असून त्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी टोचून बोलून आरोही यांना त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी (दि. 10) सकाळी आत्महत्या केली.
सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.