Sangvi : तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – तरुणाच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 सप्टेंबर 2019 रोजी पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

अभिजित रवींद्र कांबळे (वय 26) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत मुलीच्या 43 वर्षीय वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण मयत अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. त्याच्या वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

याबाबत मुलीच्या वडिलांनी मंगळवारी (दि. 24 डिसेंबर) गुन्हा नोंदवला. सांगवी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.