Sangvi : ॲसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – ॲसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला. तसेच फोन नंबर मागत तिला काठीने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी बाराच्या सुमारास जयमाला नगर, जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तेजस कमलाकर गायकवाड (वय 25, रा. जयमाला नगर, जुनी सांगवी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी तेजस याने पीडित तरुणीला फोन नंबर मागितला व घरी येण्यास सांगितले. त्यासाठी तरुणीने नकार दिला. यावरून चिडलेल्या तरुणाने त्याच्या जवळ ॲसिडची बाटली असल्याचे सांगत तरुणी त्याच्यासोबत घरी आली नाही तर तिच्या अंगावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली. ॲसिड टाकण्याच्या भीतीपोटी तरुणी आरोपीच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर आरोपीने तरुणीसोबत अशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच फोन नंबर देण्यास तरुणीने नकार दिल्याने तिला काठीने मारहाण केली. यामध्ये पीडित तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.