Sangvi : गाडी पार्क करण्यावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – गाडी पार्क करण्याच्या तत्कालीन कारणावरून तरुणावर खुनी हल्ला केला. सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री साडेआठच्या सुमारास एन. के. चौक सांगवी येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचा आरोपीसोबत मागील काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरु होता. बुधवारी रात्री सांगवीमधील एन. के. चौकात गाडी पार्क करण्याच्या कारणावरून आरोपी आणि जखमी तरुणामध्ये पुन्हा वाद झाला.

आरोपीने त्याच्या काही मित्रांसोबत मिळून तरुणाला बेदम मारहाण केली आहे. तसेच सिमेंटचा गट्टू फेकून मारल्याने जखमी तरुणाच्या चेह-यावर गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. जखमी तरुणाचा जबाब घेतल्यानंतर आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.