Sangvi : प्रेमप्रकरणातून धारदार हत्याराने वार करत तरुणाचा खून

Murder of a young man with a sharp weapon in a love affair

एमपीसी न्यूज – प्रेमप्रकरणातून चार ते पाच जणांनी मिळून एका तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. 7) रात्री पिंपळे सौदागर येथे घडली.

विराज विलास जगताप (वय 20, रा. तक्षशिला नगर, पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मयत विराज पिंपळे सौदागर येथील पुलावरून जात होता. त्यावेळी चार ते पाच जणांनी मिळून विराज याच्यावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात तो विराज जखमी होऊन बेशुद्ध पडला.

विराज याला तात्काळ उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. दरम्यान, उपचार सुरू असताना सोमवारी (दि. 8) दुपारी त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी विराजच्या नातेवाईकांनी काही संशयितांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. त्यानुसार पोलिसांनी पथके आरोपींच्या मागावर पाठवली आहेत.

हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाला असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.