Sangvi : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – नवी सांगवी येथे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती वतीने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त जनजागृती आभियान फेमस चौक, साई चौक, कृष्णा चौक, येथे स्लोगन, भिती पत्रके, स्पीकरद्वारे करण्यात आली.

महाराष्टात 2018 ला 13000 लोकांचा अपघाती मृत्यू झाला. यामध्ये 25 तें 45 वयाच्या नागरिकाचे प्रमाण जास्त आहे. 90 टक्के प्रमाण हे मानवी चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचे कारण अति वाहनाचा वेग, मद्यपान करून वाहन चालवने, चालकावरील अती कामाचा अतीरीक्त ताण, अज्ञान, लेन कटींग, ओव्हरटेक करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात होतात, म्हणून आम्ही “नजर हटी दुर्घटना घटी” आवरा वेगाला सावरा जिवाला, सेफ्टी होल्ड लाईफ इज गोल्ड, मत करो मस्ती जिंदगी नही सस्ती, सडक सुरक्षा, जीवन रक्षा, अति घाई संकटात जाई, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक अशा विविध स्लोगणद्धारे पत्रकाद्धारे, स्पीकरद्धारे प्रत्येक सिग्नलला आणि रोडवर ही जनजागृती केली.

  • शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, मुळशी विभाग महिला अध्यक्षा संजना करंजवने, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, महाराष्ट्र संघटन सचिव राजश्री गागरे, ऋतूजा जोगदंड, स्वानंद राजपाठक, पंडित वनसकर, प्रकाश बंडेवार, जालिंदर दाते, गजानन धाराशिवकर, संपदा ईतापे, राहुल शेंडगे, गोरखनाथ वाघमारे, हनुमंत पंडीत, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड, बदाम कांबळे आदीं जनजागृती आभियानात सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.