Sangvi News: अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपळे गुरव येथून केला अडीच लाखांचा गुटखा जप्त

आरोपी अमोल याने त्याच्या ओम्नी कारमध्ये (एमएच 14 जीएस 1650) शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी ठेवला.

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररीत्या ओम्नी कारमधून गुटखा विक्री केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपळे गुरव येथून दोन लाख 47 हजार 78 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

अमोल ओमप्रकाश भुतडा (वय 36, रा. पिंपळे गुरव, सांगवी) याला पोलिसांनी गुटखा विक्री केल्याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रदीप छबू शेलार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल याने त्याच्या ओम्नी कारमध्ये (एमएच 14 जीएस 1650) शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी ठेवला. सध्या कोरोनाची साथ सुरु असून गुटखा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

प्रादुर्भाव टाळण्याची कोणतीही खबरदारी आरोपीने घेतली नाही. तसेच गुटखा विक्रीसाठी बंदी असतानाही गुटखा विक्री केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोन लाख 47 हजार 78 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.