Sangvi News : नवी सांगवीत शिवरायांच्या मूर्तीचे वाटप; कोरोना नियमांचे पालन करण्याचा संदेश

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी सांगवी येथील शिव प्रतिष्ठाणच्यावतीने यंदा शिवजयंती चौकामध्ये साजरी न करता घराघरात साजरी व्हावी यासाठी शिवरायांच्या मूर्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन प्रत्येक घराघरात एक मावळा तयार व्हावा व त्याच्या मनात स्त्रियांबाबत आदर निर्माण व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच तसेच तरुण वर्गातील मुला-मुलींनी व्यसनापासून दूर रहावे, असा संदेश देत आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न शिव प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी प्रतिष्ठाणचे प्रसाद पवार, अविनाश इंदलकर, सुस्मित भाईगडे, अभिषेक पांचाळ, मंदार दाभाडे, प्रशांत माटुर, आकाश पांचाळ, पंकज धाराशिवकर, सत्यम गवंडळकर, निशिकांत वानखेडे, सुमित किजबिले, इज्जत सय्यद, आकाश सोनवणे, अतुल धनावडे आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.