Sangvi News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तरुणीवर अत्याचार केला. हा प्रकार सन 2019 ते 29 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हिंजवडी परिसरात घडला.

वसीम आयाज सय्यद (वय 31, रा. जुनी सांगवी) याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 23 वर्षीय पीडित तरुणीने शनिवारी (दि. 4) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने फिर्यादीला लॉजवर नेऊन वेळोवेळी त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.