Sangvi News : सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकांनी पळविले दागिने

एमपीसी न्यूज – सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तीन ग्राहकांनी दुकानातून 40 हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने पळवून नेले. ही घटना नवी सांगवी येथील प्रगती ज्वेलर्स येथे गुरुवारी (दि. 12) रात्री साडेसात वाजता घडली.

 

विजय मारुती देवकर (वय 39, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला आणि एक पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नवी सांगवी येथे ज्वेलर्स दुकान आहे. गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्या दुकानात दोन महिला आणि एक पुरुष ग्राहक आले. त्या तिघांनी सोने खरेदीच्या बहाण्याने कानातील झुमके पाहण्यासाठी मागितले. झुमके पाहत असताना हातचलाखी करून 40 हजारांचे 9.500 ग्राम वजनाचे सोन्याचे झुमके चोरून नेले. सांगवी  पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.