Sangvi News: कारचा धक्का लागल्याने चालकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कारचा धक्का लागल्याने कारचालकाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजता पवनानगर, जुनी सांगवी येथे घडली.

सागर नंदकुमार सोनार (वय 33, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय रायबान, अर्चना रायबान आणि त्यांचा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी जुनी सांगवी येथील पवनानगर लेन नंबर एक येथून कारमधून जात होते. त्यावेळी आरोपी संजय रस्त्यावर वेल्डिंगचे काम करत होता. फिर्यादी यांच्या कारचा संजयला धक्का लागला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच चपलेने मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.