Sangvi News: सांगवी पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाचा सापळा, लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाई दरम्यान लाच स्वीकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सांगवी पोलिस ठाण्या तील कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने आज सायंकाळच्या सुमारास सांगवी पोलिस ठाण्यातच सापळा रचला होता. त्यावेळी त्यांनी एका महिला उपनिरीक्षक आसह दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.. या कारवाईने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.. यातील लाचखोर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.