Sangvi News : पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची विश्वकल्याण उपक्रमास अभ्यास भेट

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या आरोग्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी विश्वकल्याण उपक्रमास सदिच्छा अभ्यास भेट दिली. यावेळी त्यांनी उपक्रमाच्या संशोधनाचा अभ्यास व माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ ऊंडे, डॉ. व्हि. एम. भुक्तर, गिरीश भारंबे, गणेश तनपुरे आदि उपस्थित होते.

पोलीसांचे मानसिक व शारीरिक आरोग्य, निकोप निरामय होण्यासाठी पोलीस आयुक्त प्रयत्नशील आहेत. विश्वकल्याण उपक्रम व जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षभर जीवन शैलीचे विकार व संसर्गजन्य विकारमुक्त समाज यासाठी कार्यक्रम सुरु आहेत.

सामाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. विश्वकल्याण उपक्रमाचे मुख्य संशोधक अशोकराव काळे व अनिल घनवट यांनी नुकतीच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पोलीस दलाच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत संस्थेच्या वतीने ‘निरामय पोलिस दल’ उपक्रम राबविण्याबाबत संयुक्त कार्यक्रम सादर केला.

पोलिसांना कामाचा प्रचंड ताण आहे. अपुरे मनुष्यबळ, धावपळीचे जीवन, अवेळी आहार, यामुळे जीवनशैलीच्या विकारांना सामोरे जावे लागते. साहजिकच यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुध्दा कमी होते. या संदर्भात विश्वकल्याण ऊपक्रम पोलीस दलासाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याकरीता प्रयत्न करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक काळे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून उपक्रमाचे महत्व समजावून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.