BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : पूर्ववैमनस्यातून वृद्ध महिलेला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एका वृद्ध महिलेला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी साडेचारच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 68 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजू, स्मिता, संगीता ब्राह्मणे आणि एक अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी दुपारी घरी होत्या. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरासमोर आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी महिलेशी वाद घातला. तसेच त्यांना मारहाण केली. जमिनीवर ढकलून दिले. यामध्ये फिर्यादी महिला जखमी झाल्या. घरातील मूर्ती खाली पडून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
.