Sangvi: बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याची बतावणी केली. एटीएम कार्ड बंद झाले असून ते पुन्हा सुरू करण्याचे सांगत ज्येष्ठ महिलेकडून बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे महिलेच्या दोन खात्यातून एक लाख 10 हजार रुपये काढून ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार 30 एप्रिल ते 1 मे या कालावधीत घडला.

वीणा वसंत बनहट्टी (वय 68, रा. रक्षक चौक, पिंपळे निळख) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 5) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7098873022, 6299314107, 9223966666 या फोन क्रमांकावरून मेसेज आणि फोन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी वीणा बनहट्टी यांच्याशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क केला. ‘एसबीआय कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून तुमचे दोन्ही एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहेत. ते पुन्हा सुरू करण्यासाठी माहिती द्यावी लागेल. असे म्हणत आरोपींनी वीणा यांच्याकडून एटीएम कार्डवरील सर्व माहिती घेतली. त्याआधारे आरोपींनी वीणा यांच्या पुणे येथील एसबीआय बँकेच्या खात्यातून पाच हजार आणि बंगलोर येथील एसबीआय बँकेच्या खात्यातून एक लाख पाच हजार असे एकूण एक लाख 10 हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like