Sangvi : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) पाचच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयासमोर घडली.

सचिन बाळू आडागळे (वय 32, रा. ताडीवाला रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे.

याप्रकरणी किशोर रमेश मोरे (वय 35, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वा पाचच्या सुमारास मयत सचिन औंध जिल्हा रुग्णालय समोरील सार्वजनिक रस्त्यावरून जात होते. ते रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. यामध्ये सचिन गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.