Sangvi : शारीरिक शिक्षण महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शहर सहसचिवपदी रामेश्वर हराळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळाच्या सहसचिवपदी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलचे क्रीडाशिक्षक रामेश्वर हराळे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, तेजल कोळसे पाटील, मुख्याध्यापिका हर्षा बांठिया, पर्यवेक्षक रिंकू शिंगवी, प्रिया मेनन यांनी अभिनंदन केले.

आपल्या निवडीबद्दल रामेश्वर हराळे यांनी सांगितले की, शालेय मुलांच्या वाढीकडे, तंदुरुस्तीकडे, शारीरिक आणि मानसिक संतुलनाकडे शारीरिक शिक्षकांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. सुदृढ पिढी तयार करण्याचा मार्ग हा शारीरिक शिक्षणातूनच जातो हे लक्षात घेतले पाहिजे.

  • आज मुलांचा कल बहुतांशी मोबाईल, टीव्हीकडे दिसतो. घरी बसून हे सगळे करण्यापेक्षा मैदानात मुले खेळली, तर त्यांची शारीरिक, मानसिक वाढ उत्तम होईल, यासाठी मुलांना मैदानी खेळाकडे वळवण्याचा मानस आहे. तसेच क्रीडा शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे रामेश्वर हराळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.