Sangvi : पूर्ववैमनस्यातून वाहनांची तोडफोड करणारे टोळके पोलिसांच्या ताब्यात

Police arrest gangs for vandalizing vehicles out of prejudice

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथे रविवारी रात्री टोळक्याने धुडगूस घालत सात वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अवघ्या चार तासात 11 जणांच्या टोळक्याला ताब्यात घेतले.

कुणाल राजेंद्र सरतापे (वय 20), चेतन रामनवल साहानी (वय 22, दोघेही रा. कस्तुरबा गांधी वसाहत, बौध्द विहार, औंध, पुणे), रोहन कुमार जोगदंड (वय 22), यशवंत सुनिल अवघडे (वय 21, दोघेही रा. इंदिरा वसाहत, आंबेडकर चौक, औंध पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यांच्यासह अन्य सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राजकुमार आरसन पिल्ले (वय 25, रा. शारदा कॉलनी, पिंपळे निलख) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी हा विधीसंघर्षीत बालक असून तो त्याच्या एका साथीदारासह पिंपळे निलख स्मशानभुमी जवळ लपला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण 11 जणांना ताब्यात घेतले. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचे आरोपींनी पोलीस तपासात सांगितले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी संजय गवारे, नारायण जाधव, प्रविण दळे, धर्मराज आवटे, लक्ष्मण आढारी, तुषार शेटे, संतोष असवले, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, आदिनाथ ओंबासे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.