Sangvi police station : सांगवी पोलीस ठाण्यात लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून एका पोलिसाला लाच घेताना पकडले आहे. यामध्ये ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

तक्रारदाराला पोलीस संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी 20 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

संबंधित पोलिसासोबत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याची एसीबीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर नेमका प्रकार कळणार आहे.

चौकशीसाठी वेळ लागणार असून चौकशीअंती सविस्तर माहिती देण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.