Sangvi : फॅशन शोमध्ये प्रीती बलदवा यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज – सांगवी परिसर महेश मंडळ (महिला समिती ) तर्फे मकरसंक्रांतीनिमित्त नुकताच महिलांसाठी मेळावा घेण्यात आला. त्यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. फॅशन शोमध्ये प्रीती बलदवा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, नाटिकेमध्ये निकिता मंत्री, कीर्ती जाजू, वर्षा जाजू विजेते ठरले आहेत.

यावेळी जमनाबाई राठी, नीता धूत, प्रीती भट्टड मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया आदी उपस्थित होते. महिलांसाठी महाराष्ट्रीय वेशभूषेवर आधारित फॅशन शो आयोजित केला होता. तसेच आपल्या संस्कृतीवर आधारित मकरसंक्रातीचे महत्व सांगणारी नाटिका स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमास समाजातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

फॅशन शो स्पर्धेत प्रीती बलदवा या प्रथम तर श्रद्धा राठी यांनी द्वितीय क्रमांक पटकविला. नाटिकेमध्ये निकिता मंत्री, कीर्ती जाजू, वर्षा जाजू विजेता ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी नावंदर यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात पद्मा लोहिया, कविता लड्ढा, सुरेखा चांडक, मीरा तापडिया, श्रुती जाजू यांनी पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.