BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : बस प्रवासादरम्यान महिलेची पर्स पळवली

एमपीसी न्यूज – खडकी बाजार ते पिंपळे गुरव या बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली महिलेची पर्स पळवली. ही घटना 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

सावित्री मोगन पिल्ले (वय 50, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावित्री 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव या बसमधून प्रवास करत होत्या. त्या खडकी बाजार येथून बसमध्ये बसल्या. अज्ञात चोरट्याने सावित्री यांच्या पिशवीतील पर्स पळवली. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 34 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सावित्री पावणेचारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उतरल्या असता हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3