Sangvi : पिंपळे गुरव येथे जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी – पिंपळे गुरव येथे सांगवी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारून दहा जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 21) रात्री करण्यात आली.

धनंजय मारुती चव्हाण (वय 50, रा. अप्पर पुणे), सोमनाथ नारायण महाजन (वय 35, रा. खडकी), दिपक सुरेश लोखंडे (वय 27, रा. खडकी), विजय श्रीरंग शिवशरण (वय 55, रा. रहाटणी), करीम इक्‍बाल शेख (वय 25, रा. अप्पर, पुणे), संजय मारुती सगर (वय 27, रा. थेरगाव), अनुज गुज्जर सिंग (वय 23, रा. बोपोडी), चंदाप्पा रामू चव्हाण (वय 27, रा. लोहगाव), इसरत रेहमत सराफतअली (वय 33, रा. भवानीपेठ पुणे), विनोद ओमप्रकाश चंडालीया (रा. खडकी, पुणे) अशी अटक आरोपींची नावे असून पोलीस नाईक कैलास पर्वतराव केंगले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सांगवी पोलिसांना माहिती मिळाली की, पिंपळे गुरव येथील हॉटेल महाराजाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या एका पत्रा शेडमध्ये  सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत अड्ड्यावर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी दहा जणांना अटक केली, तर घटनास्थळावरुन 16 हजार 710 रोख रक्कम व चार पावती पुस्तके जप्त करण्यात अली आहेत . पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.