Sangvi : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 16 वर्षीय मुलीने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मागील सात ते आठ महिन्यांपूर्वी कामासाठी घराबाहेर जात होती. सायंकाळी पाचच्या सुमारास ती कामावरून येत असताना गोविंद गार्डन येथील पुलाजवळ एका अनोळखी मुलाने तिच्याशी ओळख केली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि नंतर आरोपीने मुलीशी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर प्रेमाचे नाटक केले.

  • लग्न करण्याचे आमिष दाखवून अज्ञात आरोपीने पीडित मुलीला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.